Thursday, June 11, 2020

आठवण ही आठवण राहते

*फरक पहिल्या गुरूजी आणि*
*आता च्या गुरूजी चा*

*साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी...*
*नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन...*
*अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची.*
 *"कसे आहात गुरुजी?' वगैरे वास्तपुस्त व्हायची.*
*पोरं गुरुजींना पाहून धूम पळायची.*
*विटी-दांडू, गोट्या, रपाधपीचा कापडी चेंडू, गाडी गाडी करत फिरवले जात असलेले सायकलीचे जुने टायर अशा खेळांच्या साऱ्या जिनसा जागीच सोडून!*
*त्या वेळी सातवी पास असलं की गुरुजी म्हणून नोकरी लागायची.*
 *काही शिक्षक तर कुग्राम म्हणावं अशा खेड्यात जाऊन शाळा सुरू करायचे.*
*गुरुजींची उपजीविका* *गावावर अवलंबून असायची.*
*नंतर जेमतेम पगार सुरू* झाला. खर्च असा नव्हताच.
अगदी गावात असलेला* एखादा मोकळा वाडाही गुरुजींना मोकळ्या मनानं उघडून दिला जायचा.
 सांज-सकाळी कुणाच्याही मळ्यातून हिरव्या पालेभाज्या यायच्या.
गुरुजींच्या घराचा कोपरा कडधान्यांनी भरून जायचा.
निरशा दुधाचा मोफत रतीब असायचा.
गुरुजी ग्रामव्यवस्थेचे अविभाज्य घटक असायचे.
कुणाच्या घरी पत्र आलं की त्या घराला गुरुजींची आठवण व्हायची.
पोरगं विजार सावरत पळायचं आणि गुरुजींना घेऊन यायचं.
तोपर्यंत घरातला बाप्या अंगणात गोधडी टाकायचा.
कारभारीण चुलीत तुराट्या घालून चहाचं आधण ठेवायची.
गुरुजी येऊन पत्र वाचायचे.
थाळाभर चहा समोर यायचा.
मग अंधार पडेपर्यंत शिवारगप्पा सुरू व्हायच्या.
 त्यातच जेवणाची वेळ व्हायची. गुरुजी उठू लागल्यावर बाप्याचा आग्रह सुरू व्हायचा.
कारभारीण दाराच्या आतून पदर सावरत आदरानं म्हणायची : "आता दोन घास खाऊनच जावा की गुरुजी!' ते 'नको नको' म्हणत असतानाच काठवटीत भाकरीची थपथप सुरू व्हायची कंदिलाच्या गढूळ प्रकाशात...

खरपूस पापुद्रा आलेली बाजरीची गरमागरम भाकरी, खापराच्या तवलीतलं झणझणीत कोरड्यास, लसूण, मीठ, लाल मिरची घालून पाट्यावर रगडलेला भेळा, गाडग्यात मुरलेलं खारट लोणचं...या अन्नाला मायेची चव असायची.
तृप्त पोटानं गुरुजी उठायचे.
 झोपेनं पेंगुळलेल्या पोराच्या डोक्‍यावर हात फिरवायचे.
बाप्या कंदील घेऊन उठत म्हणायचा: "अंधार हाय...गरमासाचे किरकुडे निघत्यात...चला घरला सोडून येतो.'
 कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडासारखं ते स्निग्ध प्रेम पाहून गुरुजी भारावून जायचे.
***

गावात मुलीला पाहायला पाहुणे येण्यापासून तिचं लग्न लागेपर्यंत गुरुजींची महत्त्वाची भूमिका असायची.
दुखणं-पाखणं, अंत्यविधी, सणवार, प्रवचनं-कीर्तनं अशा प्रत्येक ठिकाणी सूत्रं गुरुजींकडंच असायची.
त्या काळी शाळा ही देवळात, एखाद्या मोकळ्या घरात, नाहीतर झाडाखाली भरायची.
खोडाला खिळा ठोकून त्याला लाकडी फळा लटकवला जायचा.
 फळ्यावर पुसट उमटलेली अक्षरं विद्यार्थ्यांच्या मनावर मात्र गडदपणे उमटायची.
गावभर पाढ्यांचा, बाराखडीचा आवाज घुमायचा.
 नंतर पत्र्याच्या, कौलाच्या इमारती झाल्या.
गुरुजींना शाळेच्या खर्चासाठी दोन रुपये "सादिल' म्हणून मिळायचा.
 डुगूडुगू हलणारं लाकडी टेबल, लांब बाकडं, रेकॉर्ड ठेवायला लाकडाची मोठी पेटी...
गुरुजी तीच पेटी खुर्ची म्हणून वापरायचे.
 पालक तर ठार अडाणी.
 पोरगं पहिलीत घालायचं तर जन्मतारीख माहीत नाही.
मग मुलगा सहा वर्षांचा झाला आहे किंवा कसं हे तपासण्यासाठी गुरुजी त्याचा एक हात डोक्‍यावरून विरुद्ध बाजूच्या कानाला लावायला सांगायचे.
हात कानाला लागला तरच पहिलीत प्रवेश!
नावाची-आडनावाची अशीच बोंब असायची.
शिंपी, लोहार, सुतार, कुंभार असे व्यवसाय असतील तर तेच आडनाव हजेरीवर लावलं जायचं.
आईनं पोराचं नाव दगड्या सांगितलं तर ते तसंच लिहावं लागायचं.
 लिहिताना गुरुजींनी "दगड्या'चा उच्चार "दगडू' असा केला तर त्याची आई म्हणायची : "दगड्याच लिवा. दगडू म्हणल्यावर त्यो भोकाड वाशितो'!
शाळेची घंटा म्हणजे रुळाचा तुटलेला तुकडा असायचा.
 घणघण असा ओळखीचा आवाज गावभर घुमायचा.
वर्गात फरशी नसायची.
साधी जमीन.
आठवड्यातून एक दिवस वर्ग शेणानं सारवावा लागायचा.
 गुरुजींचा आदेश आल्यावर आम्ही विद्यार्थी शेण गोळा करायला निघायचो.
नदीवरून बादल्या भरून आणण्याचं काम थोराड शरीराच्या मुलांकडं असायचं.
तोपर्यंत मुली परकरांचे ओचे-कोचे खोवून सारवण्याच्या तयारीत वर्गाच्या चारही कोपऱ्यांत बसलेल्या असायच्या.
 एकंदर वर्ग सारवून घेणं हा आमच्यासाठी सोहळाच असायचा.

 शाळा सुरू असताना काही पोरं गायब झाल्यावर ती पोरं कुठं गेली असतील ते गुरुजी अचूक ओळखायचे.
 शर्ट-विजार ओली असेल तर मासे धरायला ओढ्याला...
करदोरा ओला असेल तर मुलगा नदीवर पोहून आलेला...
हाता-पायांवर ओरखडे असतील तर बोरीच्या झाडावर चढून बोरं खाऊन आलेला...
 तोतरं बोलला तर बिबीची फुलं खाऊन आलेला...
हाता-पायांवर मोठाल्या लाल रेषा असतील तर कुणाच्या तरी शेतात शिरून ऊस तोडून खाऊन आलेला...
जीभ लालसर जांभळी असेल तर जांभळं खाऊन आलेला...
बोटात बारीक काटे असतील तर सबरीची बोंडं खाऊन आलेला...
तोंडाभोवती चिकटपणा असेल तर गुऱ्हाळात जाऊन गूळ खाऊन आलेला,
हाता-पायांवर पांढुरका चिकटा असेल तर कुणाच्या तरी शेतात जाऊन हरभरा खाऊन आलेला...
अशा निरनिराळ्या खुणांवरून गुरुजी विद्यार्थ्यांची चोरी नेमकी पकडायचे.
 गुरुजींनी बरोबर कसं ओळखलं म्हणून त्या वयात आम्हा विद्यार्थ्यांना अतोनात आश्‍चर्य वाटे.

शाळा अशा मजेत चालायच्या!
 आम्हाला खाकी चड्डी आणि पांढरा सदरा असायचा.
अनेकांच्या चड्डीच्या मागच्या बाजूला कमी-जास्त मोठी असलेली आयताकृती ठिगळं असायची.
 सदऱ्याचा पुढचा भाग फाटलेला म्हणून ते फाटलेलं झाकण्यासाठी पुढून शर्टिंग आणि मागचं चड्डीचं ठिगळ झाकण्यासाठी सदऱ्याचा मागचा भाग शर्टिंग न करता तसाच राहू दिला जायचा.
खतांच्या गोण्यांपासून दप्तराच्या पिशव्या शिवलेल्या असायच्या.
 त्या खतांच्या कंपनीचे आम्ही विद्यार्थी चालते-बोलते प्रचारक होतो म्हणा ना!
अडचणी होत्या...
संकटं होती...
पण शिक्षण मात्र सकस होतं.
 गुणवत्तापूर्ण होतं.
मात्र, गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी तेव्हा खंडीभर साधनं नव्हती.
 डोक्‍यावर व्यवस्थेची जीवघेणी उतरंड नव्हती.
गुरुजींवर विश्वास होता.
***

काळ बदलला. समाज बदलला.
 विद्यार्थी बदलले. गुरुजी बदलले.
 सारवणाच्या जमिनी जाऊन फरश्‍या आल्या.
भिंती रंगल्या.
शाळा मेकअप केल्यासारख्या सजल्या...
देखण्या झाल्या!

संगणक आले.
शाळा डिजिटल झाल्या.
तंत्रज्ञानानं शिक्षण व्यापलं.

 गुरुजींच्या खिशात डायरीऐवजी मोबाईल आले.
प्रोजेक्‍टरवर अभ्यासक्रम आला.
 साऱ्याच कवितांना एकच सरकारी चाल पाहून मुलं बावरली.
 हेडमास्तरांना बसायला देखणी खुर्ची आली; पण तिला असलेल्या अदृश्‍य काट्यांनी ते अस्वस्थ झाले.

 मोठं टेबल आलं; पण ते अहवालाच्या कागदांनी गुदमरून गेलं.
पोरांच्या अंगावर इंग्लिश धाटणीचे ड्रेस आले.
शाळेला कंपाउंड आलं आणि गाव शाळेपासून दुरावत चाललं.
***

आता गावाचं गुरुजींवाचून काही अडत नाही.
वरून अफाट अनुदान येतं.
 शाळेत पैसा आला: त्यामागं राजकारण आलं.
 राजकारणामागं गाव आलं.
 गावपुढारी शाळेत लक्ष घालू लागले.
 आठवीपर्यंत कुणाला नापास करायचं नाही...
मुलांना मारलं तर गुरुजींना तुरुंगात टाकण्याच्या धमक्‍या सुरू झाल्या.
 धाक, दरारा, भीती नष्ट झाली.
 "आनंददायी'च्या नावाखाली जणू स्वैराचारच सुरू झाला.

 कृतीपेक्षा प्रशिक्षणं जास्त झाली.
 गुणवत्तेपेक्षा मूल्यमापनाची साधनं जास्त झाली,
शिक्षकांपेक्षा शिक्षणतज्ज्ञ जास्त झाले.
सारं काही जास्त झालं; पण नेमकं काहीतरी कमी असल्याचं जाणवू लागलं...

साऱ्या सुविधा असूनही शिक्षणव्यवस्थेत रितेपणा असल्याची भावना दाटून आली आहे...
भरल्या घरात एकटेपणा वाटावा तशी.

*काय ते समजत नाही; पण काहीतरी हरवलंय...!*

Tuesday, June 9, 2020

गुरु विना ज्ञान नाही

          ।।।गुरु विना ज्ञान नाही।
   
              हे तितकेच खरे आहे। कारण आपल्याशी सल्लामसलत करणारा योग्य अयोग्य सांगणारा सल्लागार असावाच लागतो।
             संकटामुळे अनेक वेळा माणसंच खच्चीकरण होत। पण याच समयी योग्य गुरू असेल , आपला शुभचिंतक असेल तर मार्ग नक्कीच सापडणार।
             त्यामळे आपलं जीवन यशस्वी होण्यासाठी यशस्वी गुरु आवश्यक आहे। गुरु ची निवड देखील खूप महत्त्वाची आहे। वेळ प्रसंगी सर्वात महत्त्वाचे, आपल्या भल्या साठी निर्णय गुरु कडून मिळणं महत्वाचं आहे।
            गुरु मुळे आपल्या राग,लोभ, मत्सर, अशा अनेक गुणा मुळे आपलं निर्माण चुकण्याची दाट शक्यता असते पण अशा वेळी गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील। आपलं भविष्यात होणार नुकसान वाचेल।
            आपण पहा आई वडील आपले गुरुजी यांना नेहमीच गुरुच मानलं आहे, आणि आसतात ही त्यामुळे आपल्याला नेहमी चांगला आशिर्वाद देतात। आपल्या भल्या साठी त्यांच विचार चक्र चालूच असतं।
            परंतु आज जगातील ज्ञानची कक्षा खूप मोठ्या झाल्या आहेत। टेक्नॉलॉजी ने अंतरविळात मजल मारली आहे।त्यामुळे आज कदाचित आपल्याला आशा गुरुची पण गरज लागेल की,तुम्हाला तेथे करिअर करायचंय आहे। तसे पण मार्गदर्शक गुरु लागतील।
              म्हणून आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आशा गुरू ची निवड करा की त्याच्या विचारांचा प्रभावमुळे आपण प्रेरीत होऊच तसेच आपल्या जीवनात त्याचं विचार ही गुरुकिल्ली असेल।
@ 9403165812👍👍

धन्यवाद!!!!

Thursday, May 28, 2020

आज ची मेहनत उद्याची कमाई आहे।

आज आपण आपला वेळ
 योग्य प्रकारे गुंतवणूक करून
 ठेवत असाल तर आपलं उज्ज्वल
भविष्य आपलं वाट बघत आहे।

Sunday, May 24, 2020

मनुष्य जीवन सुंदर आहे!

🛑 बोध कथा 🛑

*एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.*

*एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले,  राजाला आश्चर्य वाटले.*

*सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.*

*राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला "अशी भेट वारंवार भेटत नाही."*

*मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.*

*मानवी जीवन अनमोल आहे.*
*असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.*

                    🛑 बोध 🛑
   
*या जगात  दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.*

Wednesday, May 20, 2020

मेहनत

कष्ट करून यशस्वी होण्यासाठी मेहनत करावी लागते।

Saturday, May 16, 2020

आपलं नियोजन

           दररोज धकाधकीच्या जीवनात आनंद हरपून गेला आहे. चेहऱ्यावर तरुणपणीच तारूण्य संपलेलं आहे. दररोज ताणतणाव कमी होत नाही. काहीच सुचत नाही. चोहीकडे च अंधार पडला आहे, असे नेहमीच का वाटते?
          आपल्या वेळच नियोजन करा,खर्चाचे पण नियोजन करा, पैसा इनकम त्याच पण नियोजन करा, पुरेशी झोप व विश्रांती चे नियोजन करा, फिरणं व हिंडणे याचे नियोजन आसुध्या.

Saturday, May 9, 2020

पत्नी बद्दल थोर विचार

*बायकोला किती किंमत द्यायची ????*

*नाते अर्धांगीनीचे*

*एक रामलाल नावाचा घरगडी होता. तो आपल्या बायकोला खूप घाबरत असे. दिसायला हट्टा कट्टा होता पण तरी देखील बायकोला* *घाबरत असे. एक दिवस मालकाने त्याला विचारले रामलाल तू बायकोला एवढा का घाबरतोस. त्यावर त्याने उत्तर दिले, ‘साहेब मी घाबरत नाही तर तिची कदर करतो, तिचा सन्मान करतो.” त्याचे हे बोलणे ऐकून मालक हसून म्हणाले, “तिच्यामध्ये असे काय आहे, ना ती सुंदर आहे, ना ती सुशिक्षित आहे.”रामलाल म्हणाला, काही फरक पडत नाही..साहेब कि ती कशी आहे, पण मला सगळ्यात प्रेमाचे नाते तिचेच वाटते. त्याचे बोलणे ऐकून मालक म्हणाला. बायकोचा बैल आहेस, तिच्या पदराला बांधून घेतले आहे. स्वतःला आणि इतर सगळ्या नात्यांची किंमत नाही  तुला.......रामलालने सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि उत्तर दिले. साहेब आई-वडील नातेवाईक नसतात, ते देव असतात. त्याच्या सोबत नाते नसते निभवायचे, त्यांची पूजा करायची असते. भाऊ-बहिणी सोबत नाते हे जन्मजात असते. मैत्रीचे नाते हे स्वार्थाचे असते. आपलेच नाते पहा फक्त पैसे आणि गरजेचे आहे, पण पत्नी कोणतेही नाते नसताना देखील कायमची आपली होऊन जाते. आपले सगळे नाते सोडून ती आपल्या सोबत येते आणि आपले सगळे सुखदुख एकत्र जगते आणि शेवटच्या श्वासापर्यत सोबत करते. एका नोकराचे आपल्या पत्नी बद्दल काय विचार आहेत हे मालक ऐकत होते. तो पुढे म्हणाला साहेब, पत्नी म्हणजे केवळ एक नाते नाही तर अनेक नात्यांचा भांडार आहे. जेव्हा ती आपली सेवा करते, आपल्यावर प्रेम करते तेव्हा ती एका आई प्रमाणे करते. जेव्हा ती जीवनातील उतार चढावा बद्दल सूचित करते आणि मी आपली सगळी कमाई तिच्या हातात देतो कारण मला माहित आहे कि, ती आपल्या घराचे हित साधेल तेव्हा ती एका पित्या सारखी असते. तो पुढे म्हणाला, जेव्हा ती आपली काळजी घेते आपले लाड करते, आपल्या चुकांवर रागावते आपल्यासाठी खरेदी करते तेव्हा ती आपल्या बहिणी प्रमाणे होते. जेव्हा ती आपल्याकडे नवनवीन फरमाइश करते, नखरे करते, रुसते, हट्ट करते तेव्हा ती मुली सारखी होते. जेव्हा ती आपल्या सोबत सल्लामसलत करते, कुटुंब चालवण्यासाठी सल्ले देते, भांडण करते तेव्हा एका मित्रा सारखी होते. जेव्हा घरातील सगळे देणेघेणे, खरेदी, घर चालवण्याची जिम्मेदारी उचलते तेव्हा ती एक मालकीण होते. तो पुढे म्हणाला आणि जेव्हा ती सगळ्या जगाला विसरून एवढेच नाही आपल्या मुलांना देखील सोडून आपल्या मिठीत येते तेव्हा ती प्रेमिका, अर्धांगिनी, आपला प्राण आणि आत्मा होते. जी आपले सर्वस्व आपल्या स्वाधीन करते. मी तिचा सन्मान करतो तर हे काही चूक करतो का साहेब? मालक सगळे बोलणे ऐकत होता. हे सगळे ऐकून तो स्तब्ध झाला. एका निरक्षर आणि गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आज जीवनाचा नवीन विचार मिळाला होता. मालकाला कळले कि एवढा सन्मान तर तो त्याच्या पत्नीलाही देत नाही. तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि प्रत्येकाणे सन्मान करावा. तसेच पोस्ट कॉमेंट नक्की करा ..

Friday, May 8, 2020

सुंदर जीवन

                जीवन खरोखरच खूप भारी आहे. पाहण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. जर दृष्टीकोन च योग्य नसेल तर जीवन योग्य वाटणार पण नाही.
                 सकारात्मक विचार केला तर तो आपल्या मनात घर करून योग्यच दिशेने घेऊन जाईल. प्रगती पण होईल.
         

।।   तर चला बदलू स्व:तला । टाळू नकारात्मक वृत्तीला। ।।

9403165812@

Thursday, May 7, 2020

कुटुंबातील घड्याळ

*घड्याळ ......🕰*
        जेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिले हे मोजताही येणार नाही. पण आज पाहिले आणि
 *घड्याळयाच्या तीन काट्यात आणि परिवारात काही तरी साम्य जाणवले.*
        घड्याळ्यात तास काटा, मिनीट काटा, आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनीट काटा म्हणजे आई,व सेकंद काटा मुल असल्याचे जाणवले.
          या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली गती आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे, आणि तास पूर्णत्वास येवू शकत नाही.
       *परिवारात वडील म्हणजे तास काटा*
,याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीने व ऊद्देशाने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याच प्रमाणे वडिलांचे काम असते. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन ठामपणे आपला प्रवास करीत असतात. आणि ध्येय पुर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते.
        *आई म्हणजे मिनीट काटा असते.*
 प्रत्येक मिनीटाला (अगदी सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपे पर्यंत) तीची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न, आणि कार्यमग्न असते. मिनीट काटा जसा घड्याळ्यात फिरतांना कधी तास काट्याच्या मागे असतो, *थोड्या वेळाने थोडा काळ तो तासकाट्या बरोबर थांबतो,*
 व नंतर परत तास काट्याला मागे टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसेच आईचे असते. सतत कामात असतांना नवऱ्याच्या मागे पडल्यावर ती पुढे येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीने घालवते व नंतर परत मुलांचे सगळे करायचे आहे या प्रेमापोटी मुलांच्या(सेकंद काट्याच्या) मागे जाऊन त्यांच्या बरोबरीने राहण्याचा प्रयत्न करते.
        *आणि सेकंद काटा म्हणजे आपली मुलं.*
 ती कितीही मोठी झाली तरीही आईवडीलांच्या मागे पुढे कायम ऊत्साहाने तुरूतुरु पळतांना, खेळतांना, बागडतांना दिसतात. ती सतत तास काटा आणि मिनीट काटा(वडील, आई) यांच्या मधेच धडपडतांना दिसतात. त्यांचा पुढे पुढे सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्या पेक्षा जास्त असतो.
        जसे घड्याळाला तीन काटे व त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशीवाय पूर्णत्व येत नाही, तसेच अगदी आपल्या कुटूंबाचे आहे. या तीन काट्याप्रमाणे *आपल्या कुटुंबातील वडील, आई,आणि मुलं या़ची गती एकाच दिशेनं असल्या शिवाय घराला पुर्णत्व येत नाही.*

        पण हे लक्षात ठेवा की सेकंद, मिनिटे, तास या मुळे दिवस, आठवडे, महिने, वर्षे हे पुर्ण झाले तरी या साठी काटे आपली चौकट (घड्याळाची तबकडी) सोडत नाहीत. तशीच
 *आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे.*
 एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते,तसेच कुटुंबातील एक जरी सदस्य (काटा)चुकला
 *तर कुटुंबाचे घड्याळ बिघडून गोंधळ ऊडेल*👍🏻🙏🏻👍

आय एम विनर सेंटर मागणी

 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रा संचलित* 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 *आय. एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध* 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇...